पुणे

शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटीबद्ध – शिवाजी खांडेकर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांचे अध्यक्षतेखाली पुणे शहर शिक्षकेतर संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात बिनविरोध पार पडली.
सदर निवडणुकीत श्री. पंडित वाघमारे, ग्रंथपाल – नूमवि प्रशाला पुणे, यांची पुणे शहर अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
त्याच बरोबर खालील पदाधिकारी शहर कार्यकारिणीसाठी बिनविरोध निवडून आले. श्री.श्वेतल मोतीवाला – उपाध्यक्ष ज्ञानेश कुलकर्णी, सचिव विलास चव्हाण, कार्याध्यक्ष, तसेच सतीश घाणेकर, प्रणव गायकवाड, कौमुदि येवलेकर, कल्पना पवार,  उमेश ढोकणे,  इरफान झारेकरी, अनिल हणमघर,  राजेश कांबळे, विश्वनाथ कुलकर्णी,  ज्ञानेश्वर ढावरे, महेश गिरी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
या निमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना राज्य महामंडळ सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन शिक्षकेतरांच्या दृष्टीने शासन दरबारी प्रलंबित असणारे प्रश्नाबाबत सखोल चर्चा केली.अनुकंपा नियुक्त्यास मान्यता, १०,२०, ३० ची वेतनश्रेणी पाठपुरावा, आकृतिबंध, पदोन्नती मान्यता, वेतन पडताळणी इत्यादी कामाबाबतच्या समस्यांची सोडवणूक करणेसाठी संघटना सदैव प्रयत्नशील असून शिक्षकेतरांनी संघटित होणे गरजेचे आहे असे आवाहन शिवाजी खांडेकर यांचेकडून करणेत आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने सर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा व शहर यांच्या निवडणुका बिनविरोध होतात, त्यामुळे संघटनेमध्ये एकी व समंजस्याचे वातावरण निर्माण झाले असून पुणे जिल्हा व शहर संघटनेकडून राज्यातील इतर जिल्हे आदर्श घेत असतात असे मत अनिल माने यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, विनोद गोरे, देवेंद्र पारखे, श्रीमती मेधा गोऱ्हे व जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष सुभाष तांबे हे उपस्थित होते.