पुणेमहाराष्ट्र

अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर काळभोर, तर व्हा. चेअरमनपदी सोनाबाई शिदे यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

कदम वाकवस्ती -पुणे (हवेली): कदम वाकवस्ती येथील अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी ज्ञानेश्वर महादेव काळभोर यांची तर व्हा. चेअरमन पदी सोनाबाई अशोक शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२३ ते २०२८ ची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी(ता. १५) पार पडली.

हि निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ज्ञानेश्वर काळभोर व उपाध्यक्षपदी सोनाबाई शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय कल्याण (अण्णा) गुजर यांनी या पतसंस्थेची स्थापना सन १९९२ साली स्थापना केली आहे. तर हि पतसंस्था सुव्यवस्थित चालण्यासाठी त्यांना स्वर्गीय अॅड. पी.पी. काळभोर यांनी बहुमुल्य साथ दिली आहे.

पतसंस्था ही नागरिकांना अल्पदरात कर्ज पुरवठा करत असते. हे संस्थेचे हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पतसंस्थेमध्ये सध्या २ कोटी रुपयांच्या सभासदांच्या ठेवी आहेत. तर त्यातील पतसंस्थेने १ कोटी ७० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तर संस्थेकडे १६ लाखाचे भाग भांडवल आहे. संस्थेने ५२ लाखाची गुंतवणूक केली असून संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल ७ कोटी ५० लाख रुपये आहे. याबाबत रोख ठोक महाराष्ट्र न्यूज शी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन ज्ञानेश्वर काळभोर व व्हा चेअरमन सोनाबाई अशोक शिंदे म्हणाले कि,आगामी काळात पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणारआहे. तसेच संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन पतसंस्थेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. छोटे मोठे उद्योग, व्यवसाय या कर्ज पुरवठ्याने आत्मनिर्भर होतील. कर्ज पुरवठ्या बरोबर कर्ज वसुली करून पतसंस्थेची वाटचाल करणार आहे.

— संस्थेच्या नवनिवाचित सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे-
संचालक- सूर्यकांत दगडोबा खेटे,
संचालक- अशोक निवृती कदम,
संचालक- अनिल रामचंद्र टिळेकर,
संचालक- हरिभाऊ मारुती कदम,
संचालक- सोमनाथ कल्याणराव गुजर,
संचालक- प्रकाश अंकुश कांबळे, संचालिका- आशालता रमेश खैरे,
संचालिका- स्वाती प्रकाश काळभोर
व्यवस्थापक- मारुती सातव