पुणेहडपसर

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून धमकावणारे दोघे जेरबंद

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः
हडपसर, दि. 19 ः अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून विनयभंग करीत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. सागर सुनील हरगुडे (वय 37) आणि भूषण प्रकाश कटारे (वय 28) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. हा प्रकार साडेसतरानळी येथील रिक्षाथांबा येथे गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) घडला.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी खासगी हॉस्पिटलमध्ये बहिणीला जेवणाचा डबा घेऊन जात होती, त्यावेळी आरोपींनी तिला रस्त्यात अडवून विनयभंग केला. याबाबत फिर्यादीची आई आरोपींच्या आई-वडिलांना समजावून सांगण्यास गेले. त्यावेळी सागर हरगुडे याने पुन्हा शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली. पुढील तपास ह़डपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.