पुणेमहाराष्ट्र

पूर्व हवेलीतील सोरतापवाडी येथे रोपवाटिका व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न …

प्रतिनिधी- स्वप्निल कदम

मौजे सोरतापवाडी(गुंजाळ मळा) ता.हवेली जि.पुणे येथे दिनांक १५/१२/२०२३ रोजी महाराष्ट्र शासन कृषि विभाग व जिल्हा तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांच्या मार्फत उच्च तंत्रज्ञानावर आधारित संरक्षित शेती योजना अंतर्गत रोपवाटिका व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष .विजय हिरेमठ, प्रकल्प संचालक,आत्मा जि.पुणे यांनी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, पिक प्रात्यक्षिक प्रकल्प, शेतीशाळा,शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी सहल, शेतकरी गट निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गटांचे रोपवाटिका व्यवस्थापन मधील महत्व,डाॅ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय योजना , सेंद्रिय शेती, जैविक निविष्ठांचा अवलंब,रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा नियंत्रित वापर बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डाॅ.के.व्ही प्रसाद, संचालक ,केंद्रीय पुष्पोत्पादन संशोधन केंद्र,पुणे.यांनी रोपवाटिका व्यवस्थापन मध्ये मातीचे आरोग्य, पिकांचे आरोग्य, महिलांचा रोपवाटिका व्यवस्थापन मधील सहभाग व संधी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी, शेतकरी गट निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञानावर आधारित संरक्षित शेती मधील पिकांचे निर्यातक्षम उत्पादन, निर्यात मधील संधी व विक्री व्यवस्थापन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मा.श्री.वसंतराव बिनवडे,तंत्र अधिकारी,विभागीय कृषि सहसंचालक,पुणे यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत राबविण्यात येत असलेल्या संरक्षित शेती योजना अंतर्गत हरितगृह उभारणी, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग व अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका, फळरोपवाटिका परवाना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत विविध योजना बाबत तांत्रिक मार्गदर्शन करुन शासकीय अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

श्रीमती डाॅ प्रज्ञा माने मॅडम, कृषि अधिकारी, फलोत्पादन विभाग,कृषि आयुक्तालय, पुणे यांनी फळरोपमळे अधिनियम १९६९ ,फळरोपवाटिका परवाना, आदर्श फळरोपवाटिका उभारणीसाठी मातृवृक्ष निवड ,कलमे /रोपे उत्पादन व विक्री बाबत मार्गदर्शन केले.

डाॅ.श्रीकांत कारेगावकर, पुणे जिल्हा लिड बॅक मॅनेजर यांनी रोपवाटिका व्यवस्थापन मधील हरितगृह , शेडनेट हाऊस,सुक्ष्म सिंचन,सामाईक पायाभूत कृषि सुविधा व मुल्य साखळी ,कृषि प्रक्रिया उद्योग प्रकल्प उभारणी, बॅकेचे अर्थसहाय्य व अनुदान बाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

डाॅ.डी.एम..फिरके,किटक शास्त्रज्ञ , केंद्रीय पुष्पोत्पादन संशोधन केंद्र,पुणे यांनी रोपवाटिका मधील शोभेची झाडे, फुलझाडे व भाजीपाला पिकांच्या विविध किडींची माहीती व नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना,सापळा पिके,प्रकाश सापळे,चिकट सापळे,जैविक कीटकनाशकांचा अवलंब व शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर बाबत माहिती दिली.

डाॅ गिरीश, शास्त्रज्ञ ,केंद्रीय पुष्पोत्पादन संशोधन केंद्र, पुणे यांनी रोपवाटिका मधील फुलपिके, शोभेची झाडे, भाजीपाला या पिकांच्या लाल कोळी,नागअळी, रसशोषक किडी, गोगलगाय,थ्रीप्स किडीचा प्रादुर्भाव व नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डाॅ.राहुल यादव , शास्त्रज्ञ, केंद्रीय पुष्पोत्पादन संशोधन केंद्र पुणे यांनी हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी,सुक्ष्म सिंचन पद्धती मधील अभियांत्रिकीचा तंत्रज्ञानाचा अवलंब, पुष्पोत्पादन पिके, भाजीपाला पिके व शोभेची झाडे काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग प्रकल्प उभारणी व पिकांचे मुल्य वर्धन,पाॅलीटनेल बाबत माहिती दिली.

श्रीमती लता शर्मा, प्रशिक्षण प्रमुख ,बायफ संस्था, उरुळी कांचन यांनी महिला बचत, महिला बचत गट संघ, महिला बचत शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना ,चारापिक उत्पादन , दुग्धव्यवसाय व दुग्धजन्य प्रक्रिया प्रकल्प, रोपवाटिका व्यवस्थापन मधील महिला बचत गटांना सहभाग तसेच विविध शासकीय अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मेघराज वाळुंजकर, कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देताना महाडीबीटी पोर्टल वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये आॅनलाईन अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन केले.कृषि यांत्रीकरण योजना, सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन संच, मग्रारोहयो अंतर्गत बांधावर फळबाग लागवड, सलग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, रोपवाटिका मधील पिकांचे एकात्मिक पद्धतीने किडरोग नियंत्रण व उपाययोजना, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन,जमिनीचे आरोग्य व माती तपासणी अहवाल नुसार खतांचा वापर, सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर बाबत मार्गदर्शन केले.

मारुती साळे, तालुका कृषि अधिकारी, हवेली व गुलाबराव कडलग, मंडळ कृषि अधिकारी हडपसर,  रामदास डावखर,कृषि पर्यवेक्षक हडपसर-२ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शंकर चव्हाण,कृषि सहाय्यक, सोरतापवाडी यांच्या सहकार्याने कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

श्रीमती रेश्मा शिंदे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक,आत्मा , हवेली यांनी प्रशिक्षण वर्गास उपस्थित असलेल्या व्यासपिठावरील सर्व मान्यवरांचे व उपस्थित प्रशिक्षणार्थीचे आभार मानले.
शंकर चव्हाण,राजेंद्र भोसेकर,कृषि सहाय्यक योगेश चौधरी, प्रसाद कड,सागर कड ,चिंतामणी मित्रमंडळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच सदर कार्यक्रमास तारकनाथ सहा, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय पुष्पोत्पादन संशोधन केंद्र पुणे,श्रीमती प्रथा के, शास्त्रज्ञ, केंद्रीय पुष्पोत्पादन संशोधन केंद्र, पुणे सुमित शिंदे,कृषि अधिकारी,बागुल,कृषि विस्तार अधिकारी,श्रीमती पुष्पा जाधव,श्रीमती ज्योती हिरवे, कृषि सहाय्यक युवा शेतकरी सुयोग चौधरी, भाऊसाहेब मेरगळ,सुप्रीम जगताप, संतोष शिंदे तसेच परिसरातील सर्व रोपवाटिका व्यावसायिक महिला व युवा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.