पुणेमहाराष्ट्र

मकोकातील तडीपार गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कामगिरी

पुणे, दि. १३ ः मकेका गुन्ह्यातील फरार तडीपार आरोपीला मांजरी बु।। (ता. हवेली) येथे बेड्या ठोकल्या. राक्या ऊर्फ राकेश देविदास थोरात (वय २३, रा. मांजराईनगर, मांजरी बु।।,. ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट-६मधील पोलीस अंमलदार मुंढे यांना मकेकातील आरोपी मांजरी बु।। येथील भापकर मळा येथे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेत अटक करून पुढील कार्यवाहीसाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रवीण पवार, ्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-६चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, महेंद्र कडू, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.