📍 पुणे –
पुणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांवर ‘स्वच्छतेच्या नावाखाली’ दुहेरी आर्थिक बोजा लादण्यात येत आहे. घरं कोणत्याही प्रकारची असो – बैठी, सोसायट्या, दुकानं, हॉस्पिटल्स वा फूड सेंटर्स – सर्वांकडून आधीच ‘स्वच्छ कर’ आकारला जातो. परंतु, त्यानंतरही महानगरपालिका ‘स्वच्छता शुल्क’ म्हणून पुन्हा पैसे वसूल करत आहे. हा अन्यायकारक आणि दुटप्पी व्यवहार नागरिकांच्या संयमाचा अंत पाहणारा आहे.
शिवसेनेने आज या मुद्द्यावर तीव्र भूमिका घेत, 1 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण पुण्यातून कचरा विनामूल्य उचलण्याची योजना राबवण्याची मागणी केली आहे.
⚠️ गंभीर समस्या; आरोग्य धोक्यात
मुंढवा, मगरपट्टा, हडपसर गाव, सातववाडी, कृष्णानगर, महादेववाडी, कौसर बाग, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, हांडेवाडी, औताडेवाडी, होळकरवाडी या भागांमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर कचरा न उचलल्याने दुर्गंधी, रोगराई आणि नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
❌ वेगवेगळे नियम – पुणेकरांवर अन्याय
महानगरपालिकेने काही भागांमध्ये कचरा विनामूल्य उचलला जातो, तर काही ठिकाणी शुल्क घेतले जाते. हे धोरण पुन्हा एकदा ‘प्रभागद्वेष’ दर्शवत आहे. एकाच शहरात नागरिकांशी असा भेदभाव का?
🔥 शिवसेनेचा इशारा:
“४ दिवसांत समस्येवर उपाय न झाल्यास, हडपसरमधील कचरा थेट महापालिका अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये फेकण्यात येईल!”
शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, महानगरपालिका जर 1 ऑगस्टपूर्वी निर्णय घेत नसेल, तर “शिवसेना स्टाईल” आंदोलन उभं करण्यात येईल आणि प्रशासकीय ढिसाळपणाचा जाब विचारला जाईल.
📢 शिवसेनेच्या मागण्या:
1. 1 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण पुण्यातून कचरा विनामूल्य उचलावा.
2. ‘स्वच्छ कर’ आणि ‘स्वच्छता शुल्क’ यातील दुहेरी बोजा त्वरित रद्द करावा.
3. घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियमित सेवा पुरवावी.
4. सर्व प्रभागांत समान धोरण लागू करावं.
📌 पुणेकरांनीही आता आवाज उठवावा! शिवसेना आहे तुमच्या पाठिशी!