मुंबई

“उदयनराजे” आणि “शिवेंद्रसिंहराजेंची” झाली दिलजमाई ; शरद पवार यांच्या गुप्त बैठकीत समझोता

मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सातारच्या दोन्ही राजांमध्ये असणारे आपसी कलह मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईमध्ये उदयराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांना सोबत घेऊन शरद पवार यांनी गुप्त बैठक घेतली त्यात दोघांची दिलजमाई झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद हे नवीन नाहीत . एकमेकांना कोंडीत पकडण्याचा दोघांनी हि नेहमीच प्रयत्न केला आहे . हे सर्व वाद सुरु असतानाच शिवेंद्रराजेंनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील यांची भेट घेतली होती . त्याचे पडसाद राजकारणात चांगलेच उमटले होते . शिवेंद्रराजे हे उदयराजेंसोबत असणाऱ्या वादामुळे भाजपच्या उमेदवाराला मदत करणार का ? असा देखील मतप्रवाह सातारच्या राजकारणात वाहू लागला होता. या सर्व घडामोडीवर मुसद्दी शरद पवार बारीक लक्ष ठेवून होते. म्हणूनच त्यांनी दोघांना मुंबईमध्ये एकत्र बोलवून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे .

लोकसभेची निवडणुकीसाठी अत्यंत बारीक रणनीती आखून लढण्याचा निर्धार शरद पवार यांनी केला आहे. एक-एक जागा जिंकणे राष्ट्रवादीसाठी सध्या महत्वाचे वाटते आहे.  म्हणूनच शरद पवार यांनी बालेकिल्ल्याला खिंडार पडण्यापासून वाचण्यासाठी दोन्ही राजांची दिलजमाई केली आहे.

0 0 votes
Article Rating
5 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments