
हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
महाराष्ट्र आरोग्य मंडळ संचलित, डॉ.दादा गुजर इंग्लिश मिडीयम स्कूल, महंमदवाडी, हडपसर या शाळेचा वार्षिक क्रीडा दिन शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरुण शिंदे सर यांची उपस्थिती होती.
या वर्षीच्या क्रीडा दिनानिमि्त मुलांची परेड, वेगवेगळ्या कवायती व वयोगटानुसार विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे पालकांनीही या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्ततेने भाग घेतला व बक्षीस पटकावले.
“कोणतेही टेंशन घेऊ नका, सदैव हसत खेळत व व्यायाम करत निरोगी रहा ” असा संदेश प्रमुख पाहुण्यांनी या वेळी दिला. या वेळी संस्थेचे मान्यवर सदस्य अरुण गुजर,श्रीमती निवेदिता मडकीकर, श्रीमती नीता वीरकर मॅडम, मुख्याध्यापक प्रकाश भापकर यांची उपस्थिती होती. संस्थेचे सचिवअनिल गुजर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रीडा दिन पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेचे क्रिडा शिक्षक अझीम पठाण यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपिका तांबेकर यांनी केले.
