पुणे

पुण्यात नेतृत्व नसल्याची शिवसेना नेत्यांना सल, शहरप्रमुख बदलाचे वाहतेय वारे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांचे नाव आघाडीवर

पुणे(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन )-
राज्यात सत्ता आली पण पुणे शहरात एकही आमदार नसल्याचे शल्य शिवसेना नेत्यांना बोचत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेले राजकीय बदल आणि तत्पूर्वी झालेल्या शहर पातळीवरील शहराध्याक्षांच्या कामकाजाच्या पद्धती पाहता आता पुण्याच्या शिवसेनेला नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज भासू लागली आहे, आवश्यक्यता भासू लागली आहे. महापालीकेबाहेरील किंवा नगरसेवक नसलेला शहर प्रमुख देण्या ऐवजी आक्रमक नगरसेवकाच्या खांद्यावर शहरप्रमुख पद देण्याच्या हालचाली वाढल्या आहेत, आक्रमक नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांचे नाव आघाडीवर असून दुसऱ्यांदा हडपसर विधानसभा मतदारसंघात पद येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
2014 च्या मागील विधानसभा निवडणुकीत पुणे शहरात आठही आमदार भाजपचे निवडून आले होते, त्यानंतर त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आग्रह करूनही युतीमध्ये शिवसेनेला भाजपने एकही जागा सोडली नाही याचा वचपा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काढला त्यामुळे शहरात दोन भाजपच्या आमदारांना पराभव पत्करावा लागला, राज्यात महाविकासाघाडी निर्माण होऊन शिवसेना सत्ते आली मात्र पुण्यात नेतृत्व नसल्याचे शल्य नेत्यांना टोचत आहे, पुणे शहरातील मरगळ झटकून काढण्यासाठी नव्या दमाच्या नागरसेवकास शहरप्रमुख करून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बांधणी करण्याचा चंग सेनेच्या नेत्यांनी बांधला आहे.
संपूर्ण शहर ढवळून काढेल असे उमदे नेतृत्व कोण असेल त्यास शहरप्रमुख पद आता देणे भाग पडणार आहे. या दृष्टीने हडपसरचे तिसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे आणि कसब्यातील विशाल धनवडे या दोन नगरसेवकांची नावे पुढे येत असल्याचे वृत्त आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विधानपरिषद उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्याशी विचारविनिमय करून खासदार संजय राऊत आणि स्वतः मुख्यमंत्री असलेले सेनाप्रमुख उद्धव ठाकरे  हे पुण्याचा “शहरप्रमुख” निवडण्यात जातीने लक्ष घालतील असे चित्र आहे.

आजपर्यंत भाजपच्या नेत्यांच्या सल्ल्याने शहरप्रमुख निवडले गेले कि काय अशी शंका वाटावी अशी स्थिती होती त्याला आजपर्यंतच्या शहर प्रमुखांचा कारभार देखील जबाबदार होता. नावाला पदे घेऊन मिरवायचे आणि सत्ताधारी भाजपच्या गोटात रमायचे हि पॉलीसी आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खपवून घेतली जाईल असे वाटत नाही.
नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे हे महापालिका सभागृहातील आणि आवारातील आक्रमक आंदोलक म्हणून ओळखले जातात. सर्व सामन्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही तोवर त्यांना आंदोलनापासून कोणी रोखू शकत नाही असे चित्र आजवर दिसले आहे. पालिकेतील तत्कालीन गटनेत्यांनी  मात्र वारंवार आपल्या पदाचा वापर करून अशा उमद्या नेतृत्वाला दूर ठेवण्याचे कारस्थान कायम रचले. पण आता ते नेते देखील दूर झालेले दिसत आहे. निवडणुकीच्या राजकीय इतिहासात सेनेचे आस्तित्व दाखविण्यासाठी प्रसंगी बंड करण्याचे धारिष्ट्य विशाल धनवडे यांनी दाखविले आहे. त्यांचा हेतू सेनेचा झेंडा घुमतो आहे हे दाखविण्याचा असल्याने त्याच्या या बंडाला दंड थोपटून आव्हान देण्याची कृती मानली जात आहे.

विद्यमान शहरप्रमुख काहीही अस्तित्व अगर स्वतःला मिळालेल्या संधीचा वापर करू शकलेले नाहीत हे अगदी स्पष्ट झाले आहे. अगदी रस्त्यात कोणाही तरुणाला किंवा वृद्धाला किंवा कोणालाही विचारले पुण्याच्या सेना शहरप्रमुख कोण ? तर किमान ९० टक्के लोकांना नाव सांगता येणार नाही असा त्यांचा वावर राहिला आहे.  त्यामुळे आगामी काळात सेनेला पुण्यात आपले भक्कम अस्तित्व आणि वजन निर्माण करायचे असेलतर शहर प्रमुख बदलण्या शिवाय गत्यंतर उरलेले नाही आणि त्या दृष्टीनेच आता सेनेचा जोशीला शहरप्रमुख कोण असेल जो पुण्यातला मरगळलेला प्रत्येक  सैनिक जागा करून मुसंडी मारेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने जोरदार लॉबिंग सुरू झाले असून नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडे आगामी शहरप्रमुख म्हणून पाहिले जात आहे.

Facebook Page Link

https://m.facebook.com/story.php?story_fbid=575627123253521&id=270875513728685

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x