पुणेहडपसर

रामदास आठवले मंत्री झाले कदम वाक वस्तीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

प्रतिनीधी- स्वप्नील कदम
लोणी काळभोर -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष, संघर्षनायक मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेबांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदाची निवड झाल्याबद्दल हवेली तालुक्याच्या वतीने कदमवाक वस्ती येथे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करुन पेढे,लाडू भरवण्याचा व लाडू वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला.

 

तसेच कार्यकर्त्यांन मध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.या वेळी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत सदस्य-दिपक आढाळे, यांनी सांगितले की रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाचे पहिले नेते आहेत ज्यांची सलग तिसऱ्यांदा मंत्री पदी निवड झाली आहे. या आनंद उत्सवा निमित्त कदमवाकवस्ती तंटामुक्ती अध्यक्ष-अभिजीत बडदे,रिपाई युवक हवेली अध्यक्ष- अभिजीत पाचकुडवे,रिपाई पुणे जिल्हा संघटक-विशाल शेलार, रिपाई पुणे जिल्हा संपर्कप्रमुख-राजु गायकवाड,अजय धेंडे,अतुल बनसोडे,पप्पू गायकवाड,रोहित उपरगुठे,मल्हार आगलावे,रमेश गायकवाड,सचिन धेंडे,कांबळे मास्तर,हवेलीतील रिपाई कार्यकर्ते उपस्थितीत होते.