पुणे

पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कधी सुरू होणार ? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले, या देखाव्यांच्या बळावर निवडून आलेले पुण्याचे खासदार पुढे देशाची नागरी उड्डाण राज्यमंत्री झाले.
मात्र उद्घाटन करण्यात आलेलं नवीन टर्मिनल अजूनही प्रत्यक्षात सुरू झालेलं नाही. पुणे शहराच्या विकासात अडथळा ठरत असलेला हा खोळंबा संतापजनक आहे.
या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

 

“दोन दिवसांपूर्वी शेकडो प्रवासी तब्बल ३ तास विमानात अडकून पडल्याची घटना पुण्याच्या लौकिकाला गालबोट लावणारी आहे. त्यानंतर आंदोलनाच्या परवानगीसाठी आम्ही काल सोमवारी सकाळी १० वाजता विमाननगर पोलिसांकडे परवानगी माहिती. ही माहिती विमानतळ प्राधिकरणाला समजताच नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल दुपारी ०४:०० वाजता घाईघाईत ट्विट करत १४ जुलै रोजी नवीन टर्मिनल सुरू होणार असल्याचे संगितले. हे आश्वासन फसवे असून १४ जुलै रोजी टर्मिनल सुरू न झाल्यास त्याच दिवशी सायंकाळी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात येईल” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.

पुणे विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या आंदोलनात “निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन केले, आश्वासनांचे विमान हवेत गेले, खोटं बोल रेटून बोल भाजपची झाली पोलखोल, मोदीसाठी मुरलीधर दिला पुण्याचा विकास गायब झाला” अशा घोषणांनी विमानतळ परिसर दुमदुमला होता.
यावेळी प्रशांत जगताप, प्रकाश म्हस्के, आशिष माने, शैलेंद्र राजगुरू, नीताताई गलांडे, रमेश आढाव, सदाशिव गायकवाड, सागर खांदवे, किशोर कांबळे, परमेश्वर लोंढे, अश्विनी परेरा, दीपक कामठे आणि मोठ्या संखेने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.