हडपसर : “ग्रंथपाल पाचोरे यांनी आयुष्यभर पुस्तकासोबत माणसेही जोडली ” असा वक्तव्य सुर अनेक प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केला. हडपसर येथील सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविदयालयातील प्रमुख ग्रंथपाल रामनाथ पाचोरे यांच्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.सदानंद देशपांडे हे होते. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सहसचिव अरुण गुजर हे होते.
महाविद्यालयाचे संस्थापक कर्मयोगी स्व. डॉ. दादा गुजर यांनी हडपसर येथे महाविद्यालय स्थापन केल्यापासून सुमारे 35 वर्षे ग्रंथालयात अखंड सेवा देणारे वरिष्ठ ग्रंथपाल रामनाथ पाचोरे यांच्या कारकिर्दी विषयी गुण गौरव करण्या साठी गुजर, देशपांडे यांचेसह,प्राचार्या डॉ प्रणिता जोशी -देशमुख, एल. एम. सी. सदस्य डॉ सचिनकुमार पाटील,माजी विद्यार्थिनी डॉ स्वाती धनकवडे, ग्रंथपाल संदीप चोपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी,रामनाथ पाचोरे व पत्नी विमल पाचोरे यांचा पाहुणे व मान्यवरांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
आपल्याला मिळालेली रु. अकरा हजाराची देणगी त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालय पुस्तकासाठी प्रदान केली. याप्रसंगी,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ विवेक चौधरी, पदव्युतर समन्वयक डॉ नितेश जोशी, मुख्याध्यापक डी एम पाटील, साने गुरुजी रुग्णालय प्रमुख डॉ. चंद्रशेखर महाजन, सोशल वर्कर स्वाती जोशी -पवार, विश्वनाथ पेठकर,प्रथितयश माजी विध्यार्थी डॉ अजित मंडलेचा, डॉ. वंदना बाजारे, डॉ मनोज कुंभार, डॉ सुधीर दिघे, डॉ कुमार कोद्रे, सुरेश कोतवाल आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप चोपडे यांनी केले. सूत्रसंचालन मनोज कदम यांनी केले. आभार हेमा ताकवले यांनी मानले.