वेल्हे

शिरूर लोकसभा रणसंग्राम…. 15 वर्षात कोट्यवधींच्या विकासाच्या पोकळ गप्पा…. जनतेला मूर्ख करणारा खा.आढळराव पाटील पॅटर्न…. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हेची टीका

हडपसर/शिरूर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
तीन वेळा खासदारकीची संधी मिळूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात खासदार आढळराव पाटील यांना भरीव विकासकामे करता आली नाहीत, मूर्ख बनविण्याचा हा खा.आढळराव पाटील पॅटर्न आहे, केवळ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या खासदारांना आता जनता कंटाळली असून त्यांना घरचा रस्ता दाखवणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
डॉ. अमोल कोल्हे यांची आज हडपसर विधानसभा मतदार संघात भव्य दुचाकी रॅली झाली या रॅलीला प्रचंड प्रतिसाद लाभला.
माजी महापौर बंडू तात्या गायकवाड यांच्या मुंढवा येथील निवासस्थानापासून सुरू झालेली रॅली केशवनगर, मांजरी सोलापूर रोड, हडपसर, रामटेकडी, वैदुवाडी, कोंढवा कात्रज पर्यंत काढण्यात आली.
हडपसर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी सविस्तरपणे शिरूर लोकसभा मतदारसंघ व हडपसर प्रश्नांबाबत भाष्य केले.

खासदारांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात उपक्रम राबवायचे असतात परंतु खासदार फक्त कोट्यावधीची कामे केले म्हणून जनतेला सांगतात प्रत्यक्षात काही काम करत नाहीत व विकासाच्या पोकळ गप्पा मारून चौकार मारण्याच्या वल्गना करीत आहेत.
मात्र आता मतदार सुज्ञ झाले असून माझ्यासारख्या युवक चेहऱ्याला संधी मिळेल व मतदारसंघातील प्रश्न दिल्लीदरबारी मांडून सोडविणार आहे.
महिलांचे आरोग्य, ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बैलगाडा शर्यत, नाशिक हायवे, वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेक प्रश्नांवर खासदारांना काम करण्याची संधी होती परंतु त्यांनी कोणतेही काम मार्गी लावले नाही केवळ भाषणे करायची व कोट्यावधीची कामे केल्याचे सांगायचे आणि मतदारांना मूर्ख बनवायचे हा आढळरावांचा मूर्ख बनविण्याचा पॅटर्न आहे अशी टीका डॉ.कोल्हे यांनी खासदार आढळराव यांच्यावर केली
मला प्रशासनाचा राजकारणाचा अनुभव नाही असे सांगणारे आढळराव-पाटील 2005 साली सुद्धा राजकारणात नवीन होते परंतु त्यांना खासदारकीचे संधी मिळाल्यावर त्यांनी काय उपयोग केला हे सर्वांनाच अवगत आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, नगरसेवक योगेश ससाणे, माजी नगरसेवक फारूक इनामदार, सुनील बनकर माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर प्रशांत मामा तुपे, राजलक्ष्मी भोसले, माजी उपमहापौर निलेश मगर, नगरसेवक योगेश ससाणे, बंडू गायकवाड, पूजा कोद्रे, आनंद अलकुंटे, जिल्हापरिषद सदस्य दिलीप घुले, पंचायत समिती सदस्य अजिंक्य घुले, प्रशांत तुपे, बाळासाहेब कोद्रे, रोहिणी तुपे, प्रशांत सुरसे यावेळी उपस्थित होते

डॉक्टरांचा मॉर्निंग वॉक….. आणि सेल्फी ची गडबड
डॉ. अमोल कोल्हे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमुळे महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतात चर्चेत आहेत आज सकाळी त्यांनी ग्लायडींग सेंटर येथे मतदारांशी संवाद साधला पहाटे सहा वाजता क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला
जागोजागी अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांनी गर्दी केली असून त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटत आहेत मात्र अमोल कोल्हे एवढ्या गर्दीतही मोबाईल घेऊन स्वतः सेल्फी काढून चाहत्यांना दाद देत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
wow gold
9 months ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

5 months ago

Ahora que muchas personas usan teléfonos inteligentes, podemos considerar el posicionamiento de teléfonos móviles a través de redes inalámbricas o estaciones base.

Comment here