पुणे

शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साधनात आरोग्यतपासणी .

हडपसर. देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री, लोकनेते, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त साधना विद्यालयात हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेचे आजीव सेवक व साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विजय शितोळे यांनी दिली.
या आरोग्य तपासणीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नेत्रतपासणी, हाडांची ठिसूळता , 40 वर्षावरील महिलांची मेमोग्राफी करण्यात आली. व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आरोग्य तपासणीत अध्यक्ष डाॅ.मंगेश वाघ, डाॅ.सचिन आबणे, डाॅ.शंतनु जगदाळे, डाॅ.राहूल झांजुर्णे, डाॅ.मंगेश बोराटे, डाॅ.महेश गडचे यांनी आरोग्य तपासणी केली.
आरोग्य तपासणी आयोजनासाठी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व हडपसरचे विद्यमान आमदार चेतन दादा तुपे यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य विजय शितोळे, रयत बँकेचे उपाध्यक्ष लालासाहेब खलाटे, पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते,विशाल खोल्लम,राघवेंद्र कुलकर्णी, हडपसर साहित्य परिषदचे कार्यवाह प्रा.नितीन लगड उपस्थित होते.या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन डाॅ. शंतनु जगदाळे व विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांनी केले.आरोग्य तपासणीत विद्यालयातील 220 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारयांची तपासणी करण्यात आली.
डाॅ.सचिन आबणे आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना म्हणाले आम्ही सर्व रयतचे व साधना विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून गुरूजनांची आरोग्य तपासणी करण्याची आम्हांला संधी मिळाली हे आमचे भाग्यच आहे. गुरूजनांनी आरोग्याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांनाही उत्तम आरोग्याचे धडे द्यावेत…

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x