अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे. एखाद्या गरजु व्यक्तीची क्षुधा भागवणे हे पुण्य कार्य आहे. हे कार्य राजाभाऊ होले व त्यांचे सहकारी लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून करित आहे. असे मत संत शिरोमणी सावता माळी यांचे १७ वे वंशज रविकांत महाराज वसेकर यांनी व्यक्त केले. तुकाई दर्शन येथे लोककल्याण प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत असलेल्या लोककल्याण अन्नपुर्णा योजनेच्या १४ व्या लाभार्थी श्रीमती रेणुका जनार्दन बळते यांना वसेकर यांच्या शुभहस्ते किराणा माल देऊन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे,नगरसेवक गणेश ढोरे,लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले,कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी,उपाध्यक्ष दिलीप भामे,सचिव विनोद सातव,कोषाध्यक्ष प्रदिप जगताप,कार्यकारिणी सदस्य प्रभाकर शिंदे,राहुल भाडळे,इंद्रपाल हत्तरसंग,लोककल्याण पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे,उद्योगपती विशाल कामठे आदि उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरुन बोलताना संजय मोरे म्हणाले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातिल गरजु महिलांना गेली १४ वर्षे दरमहा किराणा वाटप करणारी योजना लोककल्याणकारी आहे.राजाभाऊ होले यांचे कार्य समाजाप्रती असलेले सामाजिक दायित्व सिद्ध करते.
गरजु व्यक्तीची क्षुधा भागवणे हे पुण्य कार्य – रविकांत महाराज वसेकर

348 Comments
Oldest