पुणे

“लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोव्हीड काळात केलेले कार्य वाखाणण्याजोगे – पद्मश्री गिरीष प्रभुणे”

कोवीडने देशभरात,जगभरात थैमान घातले असताना लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजाभाऊ होले व कार्यकर्त्यानीं लोकांना मदत केली,धीर दिला. गरजुंना किराणा वाटप,वैद्यकीय मदत करुन निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचा केलेला प्रयत्न वाखाणन्याजोगा आहे.असे मत पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी व्यक्त केले.
तुकाई दर्शन येथे लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतिने देण्यात येणारा यंदाचा विसावा ” लोककल्याण भुषण ” पुरस्कार मुरलीधर कचरे यांना प्रभुणे यांच्या हस्ते देण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले प्रतिष्ठानचे सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करुन समाजापुढे आणण्याचे कार्यही प्रशंसनिय आहे.याप्रसंगी व्यासपिठावर राजाभाऊ होले अध्यक्षस्थानी होते.मा.पं.स.सदस्य शंकर हरपळे,श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विकास रासकर,नितीन गावडे,दिलीप भामे,विनोद सातव,राजाराम गायकवाड,इंद्रपाल हत्तरसंग,राजुशेठ गर्जे,मोतीराम कोरे,विठ्ठल विचारे आदि व्यासपिठावर उपस्थित होते.मानचिन्ह,मानपत्र,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनाही प्रतिष्ठानच्या वतिने लोककल्याण गौरव स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी साधना कचरे यांचीही सुषमा सावळगी यांनी खणा-नारळाने ओटि भरुन साडी चोळी देऊन सन्मानीत केले
दिव्यांगाच्या सेवेसाठी,प्रश्नांसाठी केलेल्या कार्याचे,सेवेचे प्रतिक हे ” लोककल्याण भुषण ” पुरस्कार मी मानतो,उर्वरीत आयुष्यातही हा वसा मी जोमाने जोपासण्याचा प्रयत्न करेल असे सत्काराला उत्तर देताना मुरलीधर कचरे म्हणाले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना राजाभाऊ होले म्हणाले समाजात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्याला अधिक ऊर्जा मिळावी व इतरांनाही त्यातुन कार्य करण्याची प्रेरणा मिळावी.ही पुरस्कार देण्यामागची भावना आहे.
यावेळी शंकर हरपळे विकास रासकर आदिंची भाषणे झाली प्रास्ताविक वर्षा शेंडे,मानपत्र वाचन सुभाष कदम,सुत्रसंचालन प्रदिप जगताप तर आभार हरिश्चंद्र कुलकर्णी यांनी मानले.