पुणे

विविध समित्यांवर अशासकीय सदस्यांची निवड

लोणी काळभोर, दि. २२ (प्रतिनिधी – स्वप्नील कदम ) – शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एकात्मिकृत विकासासाठी समन्वय पुर्नविलोकन समिती व तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समिती गठित करण्यासाठी अशासकीय सदस्यांची निवड केली आहे.

यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी एकात्मिकृ विकासासाठी समन्वय व पुर्नविलोकन समितीसाठी काही अशासकीय सदस्यांची नावे सुचवली होती. त्यानुसार विनायक लक्ष्मण शिंदे (उद्योग क्षेत्र ग्राहक ), कांतीलाल बाबासो वागसकर (कृषी क्षेत्र ग्राहक), विपुल हनुमंत शितोळे (व्यवसायिक ग्राहक), रमेश शामराव मेमाने (घरगुती ग्राहक), केतन तानाजी जवळकर (वीज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी व्यक्ती), तानाजी काळभोर (वीज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी व्यक्ती), विजय मारुती गायकवाड (रा. कोलवडी, ता. हवेली), नम्रता प्रशांत कांबळे (रा. थेऊर, ता. हवेली), गणेश रघुनाथ मेमाणे (रा. तरडे, ता. हवेली), सुरेश गायकवाड रामदास (आहिरे, ता. हवेली), कविता दत्तात्रय आंबुरे (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), संगिता जिजाबा बांदल (रा. वडाचीवाडी, ता. हवेली), पूनम मोहन मते (रा. खडकवासला, ता. हवेली) यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे वरील सर्व सदस्यांचे तालुक्यासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.