पुणे

“संतांचा लोककल्याणाचा विचार समाजसेवेतून राजाभाऊ होले यांनी पुढे नेला – केशव महाराज नामदास” – लोककल्याण साधना गौरव ” पुरस्कार कार्यक्रम संपन्न

संतांचा लोककल्याणाचा विचार समाजसेवेतून राजाभाऊ होले यांनी पुढे नेला असून त्यांची सामाजिक वाटचाल ही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज केशव महाराज नामदास यांनी तुकाईदर्शन येथे बोलताना केले.
पुणे,हडपसरच्या सामाजिक क्षेत्रात लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसेवेचा अविरत यज्ञ चालविणारे लोककल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ” लोककल्याण साधना गौरव ” पुरस्कार व
” लोककल्याण अन्नपूर्णा योजना ” लाभार्थी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून केशव महाराज नामदास हे बोलत होते .
याप्रसंगी नगरसेवक मारुती तुपे,नगरसेवक योगेश ससाणे,मोहन बसाळे,निता भोसले,विद्या होडे,अमोल हरपळे,प्रा.एस.टी पवार,नितीन गावडे, राहुल चोरघडे,सुहास खुटवड,आदी मान्यवर उपस्थित होते.
केशव महाराज नामदास आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या नवरत्नांना १२ वा लोककल्याण साधना गौरव पुरस्कारार्थ मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
मेजर महेंद्र जाधव(लोककल्याण राष्ट्र साधना गौरव), डॉ मंगेश बोराटे(समाज), राजेंद्र गाढवे(ज्ञान), प्रकाश शेवाळे(उद्योग), नामदेव महाराज गारगोटे(धर्म), धनंजय बोराटे(सहकार), भानुदास लोंढे(कला),
विवेकानंद काटमोरे(पत्रकारिता),श्री व सौ मंगल किसन जाधव(मातृ-पितृ गौरव) २०२२ चे पुरस्काराचे मानकरी ठरले.
नवरत्नांतर्फे सत्काराला उत्तर देताना महेंद्र जाधव म्हणाले समाजाने आमच्या कार्याची दखल घेतल्याने आम्हाला हुरुप येऊन यापुढे अधिक जवाबदारीने कार्य करण्याचे बळ मिळाले आहे.
याप्रसंगी लोककल्याण अन्नपूर्णा योजनेअंतर्गत १५व्या लाभार्थी श्रीमती ज्योती शेळके यांना त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होईपर्यंत किराणा देण्याचा शुभारंभही केशव महाराजांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदिप जगताप प्रास्ताविक दिलीप भामे तर आभार विनोद सातव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंद्रपाल हत्तरसंग,प्रभाकर शिंदे,प्रविण होले,चंद्रकांत वाघमारे,गणेश सातव आदींनी परिश्रम घेतले.