पुणेहडपसर

“आमच्याशी पंगा घ्याल, तर एकेकाचा मुडदा पाडू असे म्हणत धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवित खून, आरोपींना २ तासात अटक – हडपसर तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी”

प्रतिनिधी-स्वप्नील कदम

आमच्याशी पंगा घ्याल, तर एकेकाचा मुडदा पाडू असे म्हणत धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवित खून करणाऱ्यांना अटक केली असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. सनी रावसाहेब कांबळे, (वय 25) अमन साजिद शेख (वय 22), आकाश हनुमंत कांबळे (वय 23, रा. सर्व रा. मिरेकरवस्ती, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्वप्नील विठ्ठल झोंबार्डे (वय 17) असे खून करण्यात आलेल्याचे नाव असून, विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय 17) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं १४०६ / २०२३ भादंवि कलम ३०२,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट ३ व ७ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती देताना हडपसरचे पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले की गुन्ह्यातील आरोपी सनि रावसाहेब कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे, जय येरवळे, तौफिक शेख व शाहरुख शेख यांच्या बाबत तपास केला असता तपासपथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे व अंमलदार यांना माहिती मिळाली की आरोपी गुन्हा झाल्या नंतर फरार झाले होते. आरोपींबाबत उपयुक्त माहीती गोळा करून आरोपीचा पाठलाग गंजपेठ, स्वारगेट, व हडपसर असा करत आरोपी १) आकाश हनुमंत कांबळे (वय २३ वर्ष रा. मिरेकर वस्ती हडपसर पुणे )व इतर ३ विधीसंघर्षित बालक यांना हडपसर भागातून ताब्यात घेतले. आरोपींना हडपसर पोलीस ठाण्यास घेवून त्यांच्याकडे अधिक तपासकेला असता त्यांनी मयत स्वप्नील विठ्ठल झोंबार्डे याच्या बरोबर पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खुन केला असल्याचे कबुल केले.पुढील तपास प्रमोद दोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख स, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, संदीप शिवले साो, पोनि (गुन्हे), विश्वास डगळे सो, पोनि (गुन्हे), यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, कुंडलीक केसकर, रशिद शेख, प्रशांत टोणपे, अनिरूध्द सोनवणे यांचा पथकाने अतिशय प्रशंसनीय कामगिरी केली आहे.