राजकारणात मोठे चेहरे, मोठे पैसे आणि मोठ्या पक्षांची ताकद… हेच सगळं चालतं असं मानलं जात होतं.
पण आता महाराष्ट्रातून एक नवीन नाव चर्चेत आलंय — अभिजीत दिपके!
हिंगोलीच्या सामान्य कुटुंबातला हा तरुण… पत्रकार झाला… इंजिनीअर झाला… आणि अमेरिकेतील Boston University मध्ये MS करत टॉपरही ठरला.
घरातही संघर्षाची पार्श्वभूमी… भाऊ शिक्षक… तर उच्चशिक्षित भावजयने कोणत्याही पैशांची उधळण न करता कमळाच्या विरोधात अपक्ष निवडणूक जिंकून दाखवली.
पण अभिजीत दिपके चर्चेत आलाय ते एका वेगळ्याच कारणामुळे…
बारा वर्षांपासून देशात पेटत असलेल्या बेरोजगारीच्या प्रश्नाला त्याने थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं.
जे काम मोठमोठ्या विरोधी पक्षांना जमलं नाही… ते एका तरुणाने करून दाखवलंय.
एका रात्रीत पार्टी उभी राहिली… पण असंतोष एका रात्रीचा नाही… तो अनेक वर्षांचा आहे.
म्हणूनच कोणताही मोठा चेहरा नसताना लाखो तरुण या चळवळीशी जोडले जात आहेत.
विशेष म्हणजे या आंदोलनाच्या केंद्रस्थानी गांधी आणि आंबेडकर यांचे विचार असल्याचा दावा केला जातोय.
अभिजीत दिपके यांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं — ‘आम्ही हिंसा करणार नाही… संविधानाच्या चौकटीत राहूनच लढणार.’
आणि म्हणूनच हा फक्त एक पक्ष नाही… तर नव्या पिढीच्या असंतोषाचा आवाज मानला जातोय.
पुढे काय होणार?
ही चळवळ व्यवस्था बदलेल का?
अहिंसक क्रांती घडेल का?
हे प्रश्न भविष्यात ठरतील…
पण एक गोष्ट नक्की —
देशातील तरुण आता फक्त प्रेक्षक राहायला तयार नाहीत!”
“हिंगोलीच्या तरुणाने उभी केली नवी लाट! अभिजीत दिपके कोण? | बेरोजगारीवरून युवा आंदोलन”
