पुणे

शृंगारपूर येथील श्री भैरी भवानी मंदिर सभा मंडपासाठी १५ लाखाचा निधी मंजूर झाल्याबद्दल सुर्वे परिवारातर्फे आमदार शेखर निकम यांचा जाहीर सत्कार

चिपळूण/ प्रतिनिधी: (विलास गुरव) शृंगारपूर येथील श्री भैरी भवानी मंदिराच्या सभा मंडपासाठी १५ लाखाचा विशेष निधी मा. कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला. त्यास प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. यासाठी सुर्वे परिवारातर्फे मा. आमदार शेखर निकम यांचा सत्कार संपन्न झाला. आदरणीय आमदार शेखरजी निकम यांच्या माध्यमातून याही अगोदर गडावर जाण्यासाठी शिडी तसेच प्रचित गडावरील सभामंडप याचे काम पूर्ण झाले आहे .वेळोवेळी माननीय शेखर सरांचे सहकार्य लाभत असते.

आजही बोलताना आमदार शेखर सरांनी सुर्वे परिवाराला वेळोवेळी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच यानंतर राहिलेल्या सर्व कामासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. माझे शंभर टक्के सहकार्य असून मी कायम सुर्वे परिवारा सोबत आहे असेही ते म्हणाले.यावेळी श्री.राजेंद्रजी सुर्वे ,अमीतजी सुर्वे ,शृंगारपूर ग्रामस्थ व इतर सर्वांचे या कामी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
सदर सत्कार प्रसंगी माजी अध्यक्ष श्रीयुत राजेंद्रजी सुर्वे ,माजी उपाध्यक्ष श्रीयुत चंद्रकांत दादा सुर्वे, विकासजी सुर्वे ,वसंतभाई सुर्वे ,दिलीप राजाराम सुर्वे,सुरेंद्र सुर्वे , दिलीप अर्जुनराव सुर्वे,प्रताप सुर्वे, रवींद्र सुर्वे ,अशोक सुर्वे, सुरेश सुर्वे ,सुधाकर सुर्वे ,सौ सुचित्रा सुर्वे, शैलेश सुर्वे, गौरव सुर्वे ,संजय सुर्वे अमित सुर्वे असे आजी-माजी विश्वस्त व पदाधिकारी तसेच सुर्वे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

https://youtu.be/c_QktArFy308