पुणे

हडपसरमध्ये ट्रॅफिक पोलिसांचा ‘टार्गेट गेम’? | दंड वाढला, कोंडी कायम!

कारण प्रत्येक चौकात तुमच्यावर नजर ठेवून आहे… वाहतूक पोलीस!
पुणे शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी कडक करण्यात आली असली, तरी हडपसर परिसरात एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
वाहतूक पोलिसांना वरिष्ठांकडून ‘टार्गेट’ देण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, गांधी चौक, गाडीतळ चौक, मांजरी फाटा आणि शेवाळेवाडी चौक…
या प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे.
नियम तोडला… आणि लगेच दंड!
असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक पोलिसाला दिवसाला 30 ते 40 पावत्या करण्याचं टार्गेट दिलं जातं.
यामुळे वाहतूक नियंत्रणापेक्षा दंडात्मक कारवाईवर अधिक भर दिला जात असल्याचा आरोप आहे.

 

दरम्यान, हडपसरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना…
त्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचंही नागरिक सांगत आहेत.
रस्ते जाम… वाहनांची लांबच लांब रांग… आणि दुसरीकडे दंडाची भीती!
याहून गंभीर आरोप म्हणजे—
सामान्य वाहनचालकांवर कारवाई होते…
पण काही व्यावसायिकांना कथित ‘हप्तेगिरी’मुळे मोकळीक दिली जाते.
रवी दर्शन चौकात लक्झरी बसांना बंदी असतानाही त्या सर्रास थांबत असल्याचा आरोप आहे…
आणि याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिक म्हणत आहेत.
एकीकडे वाहतूक कोंडी…
आणि दुसरीकडे वाढती दंडात्मक कारवाई…
या दुहेरी तणावामुळे हडपसरमधील वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
आता नागरिकांचा थेट सवाल—
ही कारवाई खरंच नियमांसाठी आहे?
की फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी?