लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे (प्रतिनिधी)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने तक्षशिला बुद्धीविहार कोथरूड येथे आर पी आय राष्ट्रीय निमंत्रक ऍड मंदारभाऊ जोशी, भाजपा कोथरूड मतदार संघ अध्यक्ष मा पुनीत जोशी आणि सामाजिक समरसता मंच पुणे शहर समनव्यक विजय ननांवरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच या निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या देखील आठवणी पुण्यतिथी निमित्ताने जागविण्यात आल्या तसेच मुस्लिम बांधवांना बकरी ईद निम्मित शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच जयंती निमित्ताने अभिनव उपक्रम म्हणून ऍड मंदारभाऊ जोशी आणि पुनित जोशी आणि केशव पौळे आणि उपस्थित यांचे हस्ते 10 व 12 वि मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या पेन आणि मिठाई वाटप करण्यात आली. या प्रसंगी 10 वि मध्ये 93%मिळवून उत्तीर्ण झालेल्या श्वेता प्रताप म्हस्के हीचा विशेष सत्कार करण्यात आला.या वेळी आर पी आय पुणे शहर उपाध्यक्ष मा बाबासाहेब तुरूंकमारे,मा शिवाजी कांबळे ,मुस्लिम आघाडीचे दस्तगिर शेख,निवृत्ती वाघमारे,प्रताप म्हस्के,विठ्ठल खळगे,हरीभाऊ वाघमारे,भगवान कसबे यांचे सह भाजपचे गिरीश,भेलके, दीपक पवार,सामाजिक समरसता मंच चे अभिजित गरुड आणि विजय पायगुडे यांच्यासह कार्यकर्ते आणि गुणवन्त विदयार्थी काळजी घेऊन उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आर पी आय कोथरूड मतदार संघ संपर्क प्रमुख मा केशव पौळे आणि तक्षशिला बुद्धविहार यांचे पदाधिकारी यांनी केले होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Subscribe
Login
0 Comments