पुणे

मोदी सरकारची पेट्रोल, डिझेलचे दरवाढ सामान्यांचे जगणे केले हैराण – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – सध्या कोविडच्या साथीने जनता पिचलेली आहे. अशातच पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या दरात वाढ करुन मोदी सरकारने सामान्य लोकांचे जगणे हैराण करुन सोडले आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (सोमवारी) केली.

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरातील एकहजार पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. पुण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील ३५ पेट्रोल पंपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कसबा विधानसभा मतदारसंघातील कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. पेट्रोल पंपावरील मोदींच्या छायाचित्राच्या फलकाखाली उभे राहून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महागाईचा भस्मासूर असे पोस्टर मोदींच्या छायाचित्राखाली लावण्यात आले. ‘पेट्रोल, डिझेल महागाई करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो’, ‘पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे’, ‘पेट्रोल, डिझेल शंभर पार झाली जनतेची लूटमार’, ‘मोदी सरकारने केले काय? देश विकला, देश विकला’ अशा घोषणा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिल्या.

केंद्रातील मोदी सरकारला सर्वच आघाड्यांवर अपयश आलेले आहे. पूर्वसूचना मिळूनही या सरकारने कोविड साथ नियंत्रणासाठी पाउले उचलली नाहीत आणि देशाला संकटात टाकले. लोकांचा रोजगार गेला, उद्योग व्यवसाय बंद पडले, त्यातच महागाईने डोके वर काढले, त्यावरही यांना नियंत्रण आणता आलेले नाही. चहूबाजूंनी जनता हैराण केली आणि त्यातच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवून महागाईचा आणखी भडका उडवून दिला असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या आंदोलनामध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह कसबा ब्लॉग काँग्रेस अध्यक्ष प्रवीण करपे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर उपाध्यक्ष विरेंद्र किराड, नगरसेवक रवींद्रजी धंगेकर, बाळासाहेब अमराळे, दुर्गा शुक्रे, स्वाती शिंदे, अंजली सोलापूरे, नलिनी दोरवे, पपीता सोनावणे, बबलू कोळी, राजू शेख, संदीप अटपळकर, ऋषिकेश वीरकर, अविनाश अडसूळ, नरेश नलावडे, मयूर भोकरे, योगेश भोकरे, परवेज तांबोळी, ओंकार मोरे, संजय देशमुख, शंकर शिर्के, राजू नानेकर, कुणाल जाधव आदी सहभागी झाले होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x