पुणे

हडपसर मधील जेष्ठ पत्रकार दत्तात्रय पोपळघट यांचे निधन

हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
हडपसर / फुरसुंगी परिसरात दैनिक सकाळ वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम करणारे दत्तात्रय पोपळघट यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले पोपळघट हे अतिशय मृदू, व अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या जाण्याने हडपसर मधील एक उमदा पत्रकार गेल्याची भावना आहे.
पोपळघट यांचे कर्करोगचे निदान झाले होते, त्यांच्यावर अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पुण्यातील रुग्णालयात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
दत्तात्रय पोपळघट यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील बाबूलवाडी या गावी झाला होता लहानपणी आई वडील वारले, बहिणीने त्यांचा सांभाळ केला, अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी बीएड चे शिक्षण पूर्ण केले, जिल्हा परिषदेच्या लोणी काळभोर येथील शाळेत ते नोकरीस होते, त्यांनी पत्रकारितेची पदवी घेऊन नामांकित सकाळ वर्तमानपत्रात लिखाण केले, अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले, अभ्यासू असल्याने त्यांनी अनेक व्याख्याने पण दिलेली आहेत. त्यांना पत्रकारितेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत