पुणे

लोकसभा निवडणूक; राष्ट्रवादी काँग्रेस पहिली यादी जाहीर; शिरूर व मावळ वेटिंगवर

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज):- राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली. बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नावे जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. मात्र पहिल्या यादीत मावळ आणि शिरूरच्या उमेदवारीची घोषणा न झाल्याने उमेदवारी नेमकी कोणाला जाणार याचा ‘सस्पेंन्स’ वाढला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी राष्ट्रवादीने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

मावळमधून पार्थ पवार आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतू पहिल्या यादीत पार्थ यांचं नाव मात्र जाहीर करण्यात आलं नाही. याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्याचा निर्णय योग्य वेळी जाहीर करू असं त्यांनी म्हटलं आहे तो निर्णय आमच्या मनाप्रमाणे जाहीर करू द्या असं जयंत पाटील यांनी मिश्किलपणे म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पार्थसाठी माघार घेतल्याचे सांगितले होते. तरीही पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची सुरूवातीला जोरदार चर्चा होती. मात्र अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने उमेदवारीच्या रेसमध्ये कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. शिरूरमधून अमोल कोल्हे आणि मावळ मधून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी पहिल्या यादीत करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र पहिल्या यादीत मावळसह शिरूरची उमेदवारी जाहीर न झाल्याने उमेदवारी नेमकी कोणाला जाणार याची उत्सुकता वाढली आहे.

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

१) सुप्रिया सुळे – बारामती
२) सुनील तटकरे – रायगड
३) उदयनराजे भोसले – सातारा
४) आनंद परांजपे – ठाणे
५) बाबाजी पाटील – कल्याण
६) धनंजय महाडीक – कोल्हापूर
७) मोहम्मद फैजल – लक्षद्विप
८) संजय दीना पाटील – ईशान्य मुंबई
९) राजेंद्र शिंगणे – बुलडाणा
१०) गुलाबराव देवकर – जळगाव
११) राजेश विटेकर – परभणी

हातकणंगले या ठिकाणी राजू शेट्टींना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता राष्ट्रवादीची इतर उमेदवारांची यादी पुढील दोन दिवसात जाहीर होणार आहे असेही पाटील यांनी सांगितले. मुंबईतील धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
4 months ago

It’s appropriate time to make some plans
for the long run and it is time to be happy. I’ve learn this put up and if I may I desire to suggest you some
fascinating issues or advice. Perhaps you could write next
articles regarding this article. I desire to learn even more issues about it!

2 months ago

Skąd mam wiedzieć, z kim mój mąż lub żona rozmawia na WhatsApp, to już szukasz najlepszego rozwiązania. Podsłuchiwanie przez telefon jest znacznie łatwiejsze, niż myślisz. Pierwszą rzeczą do zainstalowania aplikacji szpiegowskiej w telefonie jest uzyskanie telefonu docelowego.

2 months ago

Czy istnieje lepszy sposób na szybkie zlokalizowanie telefonu komórkowego bez wykrycia go przez niego?

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x